मेष : तुमच्या बोलण्यातून, वागण्यातून गैर अर्थ काढला जाईल. सामाजिक क्षेत्रात आरोप येईल. राग आवरा.
वृषभ : मोठे काम करून घ्या. भेट यशस्वी होईल. धंद्यात फायदा होईल. थकबाकी वसूल करा.
मिथुन – तुमचा प्रभाव वाढेल. प्रगतीची नवीन संधी तुमच्या कामात मिळेल. धंदा वाढेल.
कर्क – स्पर्धेत अव्वल रहा. नवीन कल्पना कला क्षेत्रात सुचेल. प्रेमाला चालना मिळेल.
सिंह – प्रवासात नवीन ओळख झालेल्या व्यक्तीशी जपून वागा. व्यवहारात फसगत होईल.
कन्या – घरगुती तणाव कमी होईल. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. प्रेमात यश मिळेल.
तूळ – कामाचा व्याप वाढेल. तुमचा मुद्दा पटवून देण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील.
वृश्चिक – आर्थिक व्यवहार आजच करा. ओळखीचा उपयोग करून घ्या. शेअर्सचा अंदाज घेता येईल.
धनु – वरिष्ठांच्या मर्जीच्या बाहेर जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका. दगदग जास्त वाटेल.
मकर – तुमचा प्रभाव सर्वत्र वाढेल. लोकप्रियता मिळेला. घर, जमीन खरेदी-विक्रीत फायदा होईल.
कुंभ – रेंगाळलेले काम करून घ्या. सहनशीलता ठेवल्यास कामात यश येईल. तब्येत उत्तम राहील..
मीन – महत्त्वाची कामे करून घ्या. वरिष्ठांची भेट घ्या. तुमची मागणी त्यांना सांगा.
