राज्यातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा, पुढील ४ दिवस…

मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील तापमानामध्ये कमालीची वाढ झाली आहे, त्यामुळे नागरिक उकाड्यापासून हैराण झाले आहेत. पण पुढच्या चार दिवसांमध्ये नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

संपूर्ण राज्यातील कमाल तापमानात उद्यापासून पुढचे 4 दिवस घट होणार आहे. राज्यभरातलं तापमान पुढच्या चार दिवसांमध्ये कमी होईल, अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉ.के.एस होसाळीकर यांनी दिली आहे.

मागच्या काही दिवसांमध्ये पुण्याचे तापमान 40 च्या वर जात आहे. पुण्यात एप्रिल-मे महिन्यात 40 अंश तापमानाची नोंद बऱ्याचदा झाली आहे.

तापमान 40 अंशापेक्षा जास्त झाल्यावर नागरिकांनी काळजी घ्यावी. दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत गरज नसेल तर बाहेर पडू नये, असं आवाहनही हवामान विभागाने केलं आहे.

Leave a Comment