छत्रपती संभाजीनगर – “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय लांबणीवर टाकलेला नाही. निवडणूक काळात भाजपाने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करणार आहोत. गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल”,अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना बावनकुळेंनी शेतकरी कर्जमाफीबद्दल भाष्य केले.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “योग्य शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यावर सरकार भर देत आहे. त्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. ती समिती शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करणार असून, त्या सर्वेक्षणानंतर गरजू आणि पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळेल.”
त्यानंतरच कर्जमाफीचा अंतिम निर्णय घेणार -बावनकुळे
“कर्जमाफी ही मेरिटवर झाली पाहिजे. ज्यांना खऱ्या अर्थाने मदत हवी आहे, अशा शेतकऱ्यांचा विचार केला जाईल. समाजातील सर्वात शेवटच्या घटकाला मदत करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल”, असे बावनकुळे यांनी सांगितले.
