नगरसह 15 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, पुढचे दोन दिवस वादळी वाऱ्यासह….

IMD Update: हवामान विभागाने राज्यातलं तापमान कमी होईल, असं सांगितलेलं असतानाच 15 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढचे दोन दिवस राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

राज्यात उन्हाचा पारा वाढत असल्याने दिवसा उन्हाचा तडाखा आणि संध्याकाळी वादळी पावसासह गारपीट होत असल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. याचबरोबर राज्यात वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

यामध्ये मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड या भागात पावसाची शक्यता आहे.

तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Comment