राज्यात पुढील 24 तासांत कोकणात अतिमुसळधार तर रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रत्नागिरी, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस होईल.
घाट माथ्यावर मात्र अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून अन्य जिल्ह्यांत मध्यम पावसाचा अंदाज आहे.
राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांत जोरदार पाऊस होत आहे. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. अनेक जिल्ह्यांत तीन ते चार दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे. नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा मुक्काम कायम आहे.
आताही हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील तीन ते चार तासांत अहिल्यानगर जिल्ह्यासह पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
