संगमनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथे आज सायंकाळी ढाक्कुमाकुम’, ‘ढाक्कुमाकुम’ चा सूर घुमणार आहे. कारण यंदाच्या वर्षीपासून प्रथमच बजरंग दल साकूर पठारभागाच्या वतीने दहिहंडी उत्सवाचे भव्य आयोजन साकूर ग्रामपंचायत समोर करण्यात आले आहे. सर्वत्रच दहिहंडीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. त्याप्रमाणे साकूरकरांना देखील खास उत्सव आज बघायला मिळणार आहे. गोविंदा पाच थर लावून दहिहंडी फोडणार आहे.
या दहिहंडी उत्सवासाठी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर व युवा नेते अनमोल खेमनर यांनी ११ हजार रुपयांच प्रथम पारितोषिक ठेवले आहे. तसेच बजरंग दल साकूर शाखेच्या वतीने ७ हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक ठेवले आहे.
बजरंग दलाच्या वतीने पहिल्यांदाच दहिहंडी उत्सवाचे आयोजन केलं असून या उत्सवाची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यामुळे साकूरमध्ये आज सायंकाळी आगळावेगळा उत्सव बघायला मिळणार आहे.
