संग्राम भंडारे यांच्या विरोधात पुण्यात बॅनरबाजी

पुण्यात कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आलीय. ‘आम्हाला नथुराम गोडसे व्हाव लागेल’ अशी धमकी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना दिल्यानंतर ही बॅनरबाजी करण्यात आली. पुण्यातील कोथरूड परिसरात ही पोस्टर्स लावण्यात आली. ही बॅनरबाजी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली.

‘ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम ची आहे’ अशा आशयाचे बॅनर यावेळी झळकवण्यात आले. ‘नथुराम चे गोडवे गाणाऱ्या समाजकंटकांना महाराष्ट्र भूमीत थारा दिला जाणार नाही’ असेही बॅनरवर नमूद करण्यात आले आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना उद्देशून ‘आम्हाला नथुराम गोडसे व्हाव लागेल’ अशी धमकी देण्यात आली होती. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Comment