संगमनेर(DSNews24/किरण पुरी) विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून आशीर्वाद दिल्याबद्दल सर्व मतदारांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महायुतीच्या वतीने भव्य महामेळाव्याचे आयोजन आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरातील जाणता राजा मैदानावर रविवारी २४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता करण्यात आलय.
यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर महावेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबोधित करणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अहिल्यानगर दौरा
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अहिल्यानगर दौऱ्याचा कार्यक्रम देखील समोर आलाय. रविवार दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी चार वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंदूर विमानतळ येथुन विमानाने शिर्डी विमानतळ, काकडी, ता. कोपरगांव कडे प्रयाण करणार आहे. त्यानंतर ४ वाजून १५ वाजता शिर्डी विमानतळ, काकडी, ता. कोपरगांव येथे आगमन होणार आहे. त्यानंतर हेलिकॉप्टरने संगमनेर कडे प्रयाण करणार आहे. त्यानंतर ४ वाजून ४५ वाजता संगमनेर महाविद्यालय हेलिपॅड येथे आगमन होणार आहे. तसेच मोटारीने जाणता राजा मैदान, संगमनेर कडे प्रयाण करणार आहे. त्यानंतर पाच वाजता शिवसेना महायुती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व नंतर जाणता राजा मैदानावर जाहिर आभार सभा होणार आहे.
