….म्हणून एकनाथ शिंदेंना आनंद झाला, बाळासाहेब थोरातांच “त्या” टिकेला प्रत्युत्तर 

छत्रपती संभाजीनगर(DSNews24 /किरण पुरी) शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संगमनेरमध्ये झालेल्या सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीका केली होती. या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार अमोल खताळ यांच कौतुक करताना संगमनेरकरांनी ४० वर्षांची मक्तेदारी उलथून टाकली त्यामुळे मी दर्शन घेण्यासाठी संगमनेरमध्ये आलोय असा टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचं नाव न घेता लगावला होता.

यावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिलंय. छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले.

काय म्हणाले बाळासाहेब थोरात 

एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षासाठी संगमनेरमध्ये आले होते. कारण त्यांचा आमदार तिथ आहे. त्यामुळे त्यांना काहीतरी बोलणच आहे. मी ४० वर्ष राहिलो, आठ वेळा आमदार राहिलो. प्रचंड मताधिक्यही राहिले होते. मी विधानसभेतला सर्वात सिनियर होतो. मला थांबाव लागलं यांचा आनंद एकनाथ शिंदे यांना झाला. त्यांचा पक्ष म्हणून त्यांनी भूमिका मांडली अस उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टिकेला बाळासाहेब थोरात यांनी यावेळी दिल.

Leave a Comment