महाविजय मेळाव्याचे साकूर पठारभागातील शेकडो कार्यकर्ते बनले साक्षीदार – जिल्हाध्यक्ष रऊफ शेख 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) संगमनेर येथे काल राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक आभार यात्रा व महाविजय मेळावा पार पडला. मात्र या सभेने आजवरच्या संगमनेरमधील गर्दीचा उच्चांक मोडलाय. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शहारात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या स्वागतासाठी मोठा जनसागर उसळला होता.

त्यानंतर जाणता राजा मैदानात पार पडलेल्या सभेतही मंडपात अक्षरशः बसायलाही जागा शिल्लक राहिली नव्हती. सभा ऐकण्यासाठी काहींनी उभे राहुनच सभेचा आनंद घेतला. या सभेसाठी साकूर पठारभागातुनही मोठ्या संख्येने कार्यकर्ते रवाना झाल्याचे पहावयास मिळाले. यावेळी आपापल्या खाजगी वाहनातुन कार्यकर्ते मोठ्या संख्येने गावागावातुन उस्फुर्तपणे सभेसाठी आले होते. या ऐतिहासिक महाविजय मेळाव्याचे शेकडो कार्यकर्ते साक्षीदार बनले आहे.

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांच्यासह बुवाजी खेमनर, बाळासाहेब खेमनर, अॅड.अमित धुळगंड, सुरेश भागवत, बाबाजी सागर, पाटीलभाऊ कुदनर, संतोष शेटे, दत्ता देवकाते, अशोक झिटे, राहुल शेटे, बाळासाहेब झिटे, विजय सुपेकर, संगिता बांबळे, पांडुरंग धुमाळ, राहुल मुके, धर्मेंद्र शिंदे, नंदा काकड, रवींद्र भोर, किरण भागवत, भिमराज जाधव, रणजीत ढेरंगे, बाबासाहेब गुळवे, मयुर गुळवे, सचिन गुळवे, गोकुळ उगले, उल्हास गागरे, सुभाष गागरे, राजाबापु वर्पे, एकनाथ पा.वर्पे, डाॅ.संतोष वर्पे, नितीन दिघे, बाबासाहेब मुसमाडे, निलेश वाडेकर, हरिभाऊ गिते, गणेश डोंगरे, नवनाथ गंभीरे, विकास पवार, तुषार पेंडभाजे, अनिल आमले, गोरख बागुल, सुरेश काळे, मन्सुर पटेल, युवराज खेमनर, मच्छिंद्र खेमनर, बाळासाहेब खेमनर, संतोष खेमनर, सुभाषशेठ पेंडभाजे, शिवाजी पेंडभाजे, सखाराम साळुंके, सुभाष भुजबळ, संतोष आमले, नासिर शेख, अबुझर मोमीन, नफीस चौगुले, आरिफ मोमीन, अजित कांबळे, साहिल पटेल, गजानन खाडे, बाळासाहेब वनवे, उत्तम जोशी, गणेश गाडेकर, प्रभाकर गाडेकर, सागर नागरे, श्रीकृष्ण कांगणे, बाळासाहेब गायकवाड, संकेत कांगणे तसेच इतर शेकडो कार्यकर्ते या सभेसाठी आले होते.

कोणत्याही गाड्या न पाठवता स्वयंस्फुर्तीने तालुक्यातुन मोठ्या प्रमाणावर स्वाभिमानी जनता या सभेसाठी उपस्थित राहिली. या सभेने आजवरच्या गर्दीचा उच्चांक मोडीत काढला आहे. तसेच सभेमुळे कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळाली. आमदार अमोल खताळ यांना सुपर जायंट किलर करण्यासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आव्हान पेलण्यासाठी पालकमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पा. ,खा.डाॅ.सुजयदादा विखे पा. व आमदार अमोल खताळ पा.यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते सज्ज झाले आहेत

रऊफ शेख – जिल्हाध्यक्ष,भाजपा, अल्पसंख्यांक मोर्चा

Leave a Comment