महावितरणचा गलथान कारभार ; मांडवे बुद्रुक परिसरातील अनेकांचा जीव धोक्यात, ग्रामस्थ संतप्त 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील मांडवे बुद्रुक शिवारातील शेख वस्ती परिसरात महावितरणचा मुख्य विद्युत वाहिनीचा पोल एका बाजूस झुकल्याने मोठा धोका होण्याची शक्यता आहे. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार या बाबत स्थानिकांनी माहिती देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता एखादी जिवीतहानी घडण्याची महावितरण वाट पाहत असल्याचा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहे.

सविस्तर वृत्त असे की, मांडवे बुद्रुक शिवारातील शेख वस्ती परिसरातून महावितरणच्या मुख्य विद्युत वाहिनी गेली आहे. शेख वस्तीजवळच एक मुख्य विद्युत वाहिनीचा उभा असलेला पोल एका बाजूस पुर्णपणे झुकला आहे. तसेच आसपास झाडेझुडपे देखील आहे. मात्र मुख्य विद्युत वाहिनीचा पोल एका बाजूस झुकल्याने पुर्ण लाईनला मोठा धोका निर्माण झाला आहे.

तसेच विद्युतप्रवाह देखील या लाईन वरून चालू असतो. या पोलबाबत स्थानिकांनी साकूर महावितरणचे सहाय्यक अभियंता राजेशकुमार झा व कर्मचाऱ्यांना माहिती दिली होती. मात्र उडवाउडवीची उत्तरे देऊन या अत्यंत गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले गेले. परंतु जर अचानक या पोलमुळे काही घटना घडली तर सर्वात मोठा अनर्थ घडायला वेळ लागणार नाही. तसेच जीवीतहानी देखील होऊ शकते. या गोष्टीच साधं गांभिर्य देखील नसल्याने महावितरणच्या कारभारावर ग्रामस्थ संतप्त झाले आहे.

साकूर परिसरात देखील बहुतांश ठिकाणी विद्युत वाहिनीचे पोलची दयनीय अवस्था झाल्याची माहिती समोर आली आहे. याकडे महावितरण पुर्णपणे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आता महावितरण यावर खरच लक्ष घालणार का? हाच प्रश्न पडला आहे.

Leave a Comment