शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर दिलेल्या आश्वासनांचा राज्य सरकारला विसर पडला आहे. या सरकारकडून कुठल्याही हालचाली होत नाहीत.
त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून ‘किसान सभे’च्या वतीने नगर जिल्हय़ातील अकोले येथून 26 एप्रिलला लाँगमार्च निघेल आणि 28ला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या लोणी येथील निवासस्थानावर धडकणार आहे. या ‘लाँग मार्च’मध्ये हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत.
राज्य सरकारने नाशिक ते मुंबई लाँग मार्चच्या वेळी देवस्थान जमिनी कसणाऱया शेतकऱयांच्या नावे करण्यासाठी कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. मंत्रिमंडळ बैठकीत कायद्याचा मसुदा मांडण्यासाठी अद्यापि कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत, असा आरोप ‘किसान सभे’ने केला आहे.
