लालबागच्या राजाच्या गेटजवळ भीषण अपघात, दोन चिमुकल्यांना चिरडले

मुंबई – गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या उत्साहानंतर आज लाडक्या गणरायाला वाजतगाजत निरोप दिला जात आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी आज सकाळपासूनच अवघा महाराष्ट्र रस्त्यावर लोटला आहे. याच उत्साहाच्या प्रसंगात एक दुर्दैवी घटना घडली आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान ही घटना घडली आहे.

लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध मार्गावर अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडले. या अपघातात 2 वर्षांची चंद्र वजणदार हिचा जागीच मृत्यू झाला. तर तिचा भाऊ शैलू वजणदार (11) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर परळ येथील केईम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज पहाटे 3 ते 4 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. रात्रीच्या वेळी दोन्ही मुले रस्त्याच्या कडेला झोपली होती. त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने सरळ या मुलांच्या अंगावर गाडी घातली. नंतर तिथून तो पसार झाला. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणरायाला निरोप देतानाच ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment