सध्या राज्यात ढगाळ वातावरण असून, अनेक भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरुपात पावसानं हजेरी लावली आहे. पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांमध्ये पालघर, धुळे नंदूरबार आणि नाशिक या जिल्ह्यांसह घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे.
दुसरीकडे रायगड, मुंबई, ठाणे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात पाऊस उघडीप देण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पाच दिवसानंतर राज्यात पावसाचं प्रमाण कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
