राहुरी ब्रेकिंग! अपघात मालिकेसंदर्भात चक्काजाम आंदोलन, वाहतूक ठप्प…

राहुरी(DSNews24 / कैलास पुरी) येथील हॉटेल क्रांती समोर झालेल्या अपघातात होऊन एक जणाचा मृत्यू झाला. तर शनिशिंगणापूर फाटा येथे दोन वेगवेगळ्या अपघातात एक जणांचा मृत्यू, दुसरा जखमी असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. मात्र या वारंवार होणाऱ्या अपघातांच्या मालिकेसंदर्भात राहुरी येथील मुळा नदी पुलावर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.

नागरिक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले असून माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे देखील चक्काजाम आंदोलनात सहभागी झालेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. दरम्यान अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.

DSNews24 अपडेट Live…

– राहुरी फॅक्टरी येथील काल झालेल्या आंदोलना संदर्भात ज्या 9 आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे अशी जोरदार मागणी करण्यात आली.

– नॅशनल हायवे अधिकाऱ्यांकडून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश.

– अवजड वाहने ही बाभळेश्वर येथून श्रीरामपूर मार्गे वळविण्यात आले आहे

Leave a Comment