पुणे(DSNews24) मातृभूमी स्पेशल फाउंडेशन च्या माध्यमातून पत्रकार भवन गांजवे चौकच्या शेजारी निवारा हॉल येथे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रातील कर्तुत्वान मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जगप्रसिद्ध मूर्तीशास्त्रज्ञ गो.ब.देगलूरकर व प्रसिद्ध उद्योजक किरण कदम यांना मातृभूमी सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अशोक पाटील यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे मुख्यअतिथी म्हणून गो.ब देगलूरकर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणेचे संचालक डॉ.महेश थोरवे होते. तर व्यासपीठावर युवा धोरण समिती महाराष्ट्र राज्यचे सदस्य ॲड. संग्राम नाथाभाऊ शेवाळे, किरण कंट्रक्शनचे संचालक किरण बाळकृष्ण कदम, मातृभूमी सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अशोक पाटील, भारतीय नारी संघटनेच्या संस्थापिका भारतीताई रमेश तुपे, श्रद्धाताई गोरक्ष ( आप्पा) परांडे जनहित मंच, राष्ट्रभक्ती परिवारचे अध्यक्ष सुनील सुरेश गोरे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे व अतिथी यांनी मार्गदर्शन केले. तसेच झेप फाउंडेशन पुणे (महाराष्ट्र राज्य ) संस्थापक अध्यक्ष, युवा ग्रामीण पत्रकार संघ पच्छिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष कांताभाऊ राठोड यांना उत्कृष्ट पत्रकारिता व सामाजिक कार्य राज्यस्तरीय पुरस्कार व अजिंक्य न्यूज चैनलचे संपादक युवा ग्रामीण पत्रकार संघ पच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष संतोष लांडे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जगप्रसिद्ध मूर्तीशास्त्रज्ञ गो.ब.देगलूरकर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
महाराष्ट्रभरातून विविध क्षेत्रातील 50 पुरस्कार्थीना पुरस्कार देऊन यावेळी गौरवण्यात आले. पुरस्कार देण्यामागे अशोक पाटील सर यांचे असे मत आहे की पुरस्कार हा माणसाला अजून जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा देत व कशा परिस्थितीतून मात करून ध्येयापर्यंत पोहोचतात याची एक शीख, उदाहरण लोकांसमोर उभे राहते.
