मुंबई – महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. दिवाळीनंतर दोनच दिवसांत निवडणूक आचारसंहिता जाहीर होईल, असा अंदाज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभा, विधानसभेपेक्षा नेत्यांची खरी निवडणूक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका असते. लोकशाहीमधील सर्वांत महत्त्वाची ही निवडणूक आहे. दिवाळीनंतर दोन दिवसांत आचारसंहिता जाहीर होईल, त्यामुळे निवडणुकीच्या तयारीला लागा. येणाऱया दिवाळीचा फायदा करून घ्या. लोकांना भेटून संपर्क वाढवा, असा कानमंत्र चंद्रकांत पाटील यांनी मेळाव्यात बोलताना दिला.
