घारगाव हादरले! टेम्पोत डोकावून बघताच उडाला थरकाप 

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील घारगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. पुणे – नाशिक महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या टेंम्पोत एक मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडालीय. चालकाने टेंम्पोलाच गळफास घेतल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आलाय. विकास लक्ष्मण वाघ असे मयत व्यक्तीच नाव आहे.

विकास वाघ हे आंबीखालसा परिसरात कुटुंबासोबत राहत असून ते उदरनिर्वाहासाठी वाहनावर चालकाचे काम करत होते. मात्र शुक्रवारी सकाळी महामार्गाच्या कडेला टेंपोला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह दिसून आला. यावेळी वाहन चालकांसह स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

तसेच या घटनेची माहिती समजताच घारगांव पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल रोहीदास आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर विकास वाघ यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खाजगी रुग्णवाहीकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

परंतु विकास वाघ यांनी गळफास का घेतला? यामागे काही कारण आहे का? अशी चर्चा परिसरात सुरू आहे. पुढील तपास घारगाव पोलिस करत आहेत.

Leave a Comment