पारनेरमधून नागपूरकडे महाएल्गार आंदोलनासाठी ५० गाड्यांसह शेकडो भूमिपुत्र रवाना

पारनेर(DSNews24 / किरण पुरी) शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्‍ती आणि शेतीमालाला हमीभाव मिळावा या मागण्यांच्या पूर्ततेसाठी नागपूर येथे 28 ऑक्‍टोबरपासून शेतकरी संघटनेचे मा.खा.राजू शेट्टी, अजित नवले, माजी मंत्री बच्चू कडू, माजी मंत्री रविकांत तुपकर, विजय जावंदिया यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेंच्या वतीने सरकारच्या विरोधात महाएल्गार आंदोलन पुकारले आहे. महाएल्गार आंदोलनाला भूमिपुत्र शेतकरी संघटनेेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी देखील जाहिर पाठिंबा दिला असून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ५० गाड्यांच्या ताफ्यासह शेकडो भूमिपूत्रांनी पारनेर तालुक्यातील देसवडे येथून नागपूरकडे कूच केली आहे.

दरम्यान नागपूरकडे रवाना होण्यापूर्वी भूमिपुत्रांनी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे या घोषणा दिल्या. तसेच ताफ्यातील प्रत्येक गाडीला झेंडा, स्टीकर लावण्यात आले होते. त्यामुळे या गाड्यांनी एकच लक्ष वेधून घेतले होते. विशेषतः या आंदोलनात सहभागी होण्याऱ्या भूमिपत्रांसाठी जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

राज्यातील विविध शेतकरी संघटनेच्या वतीने नागपूर येथे होणाऱ्या महाएल्गार आंदोलनातून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव या विषयांची मागणी सरकारने केली जाणार आहे. त्यामुळे या आंदोलनातून सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी शेतकरी संघटना भाग पाडणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातून देखील असंख्य शेतकरी सहभागी होणार आहेत. आता शेतकऱ्यांसाठी ही आरपारची लढाई होणार आहे.

या आंदोलनात संतोष वाडेकर, अशोक आंधळे, बाळशीराम पायमोडे, सुभाष डोंगरे, संतोष वाबळे, पोपट दरेकर, बाळासाहेब वाळुंज, संजय भोर, नंदु साळवे, चेअरमन संजय भोर, तेजस भोर, अविनाश भोर, अजित वाडेकर, काशिनाथ गोळे, रामदास साळवे, बबन भोर, सुरेश गोळे, शंकर भोर, बाळासाहेब वाडेकर, बाळासाहेब भोर, एकनाथ वाडेकर, मंजाबापू वाडेकर, नंदन भोर, संतोष गागरे, गोरख पठारे, जयवंत वाळुंज, सोपान बालवे, सतीश बागल, प्रकाश गायकवाड, दत्तात्रय झंजाड, मच्छिंन्द्र वाळुंज, संजय पवार, रावसाहेब फटांगरे, बबन भोर यांच्यासह शेतकरी मोठ्ठया संख्येने सहभागी झाले आहेत.

Leave a Comment