आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

वृषभ : संततिसौख्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

 

मिथुन : प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल. प्रवास सुखकर होतील.

 

कर्क : आत्मविश्‍वास आणि मनोबल वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

 

सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

 

कन्या : उत्साह आणि उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. मन आनंदी व आशावादी राहील.

 

तूळ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

 

वृश्‍चिक : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल.

 

धनू : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

मकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरुकृपा लाभेल.

 

कुंभ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.

 

मीन : रखडलेली कामे मार्गी लागतील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

Leave a Comment