संगमनेर(DSNews24/किरण पुरी) कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटात निवडणूकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. सलग चार वेळा कॉंग्रेसने साकूर जिल्हा परिषद गटावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या नेतृत्वाखाली झेंडा फडकला आहे. त्यामुळे या गटावर कॉंग्रेसची मजबूत पकड आहे. मात्र कोणत्याही क्षणी जिल्हा परिषदेची निवडणूकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. परंतु या निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी कॉंग्रेस थेट सुप्रसिद्ध व्यावसायिक बाळासाहेब भाऊसाहेब सागर या युवकाला तिकिट देण्याची शक्यता आहे. बाळासाहेब सागर यांचं नाव जवळपास निश्चित झाले असून फक्त उमेदवाराची अधिकृत घोषणा बाकी आहे. बाळासाहेब सागर यांची उमेदवारी निश्चित असल्याने तसा प्रचार बाळासाहेब सागर यांनी सुरू केला आहे. सोशल मीडियावर बाळासाहेब सागर यांचा युवकांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. मात्र बाळासाहेब सागर यांच्याबद्दल सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे.
बाळासाहेब सागर यांची खासियत काय आहे थोडक्यात जाणून घेऊया…
नेतृत्वाचा अर्थ म्हणजे बाळासाहेब सागर!
संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजली जाणाऱ्या साकूर जिल्हा परिषद गटातून कॉंग्रेसकडून बाळासाहेब सागर रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. बाळासाहेब सागर यांचे व्यक्तिमत्त्व, कार्यपद्धती आणि लोकांप्रती असलेली त्यांची निष्ठा यामुळे ते या गटातील एक अद्वितीय नेतृत्वाचे प्रतीक बनले आहेत. त्यामुळे साकूर गटातील मतदारांसाठी ही केवळ एक निवडणूक नसून, विकासाच्या एका नव्या पर्वाची सुरुवात आहे.
शक्ती, बळ आणि लोक संपर्काचा त्रिवेणी संगम
कॉंग्रेसचे बाळासाहेब सागर यांच्या उमेदवारीकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे, कारण त्यांच्या मागे प्रचंड शक्ती, बळ आहे. हे बळ केवळ राजकीय नसून, मतदारांच्या विश्वासाचे आणि प्रेमाचे आहे. राजकारणातील ‘साम, दाम, दंड, भेद’ या सर्व नीती-तत्वज्ञानाचा योग्य वापर करून, ते नेहमीच जनतेच्या हितासाठी धावून गेले आहे.
दिलाचा राजा माणूस
बाळासाहेब सागर यांची ओळख केवळ एक राजकारणी म्हणून नाही, तर ‘दिलाचा राजा माणूस’ अशी आहे. त्यांचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी नेहमी उघडे असतात आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखात ते खंबीरपणे उभे राहतात.
हुशार आणि टेक्निकल
आजच्या आधुनिक काळात नेतृत्वात हुशारी आणि तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक आहे. बाळासाहेब सागर यांच्याकडे दूरदृष्टी आहे. गटाच्या समस्यांवर केवळ तात्पुरते उपाय न शोधता, भविष्याचा वेध घेणारे आणि तंत्रज्ञानाचा वापर करणारे कायमस्वरूपी उपाय सुचविण्यात तत्पर आहे.
कायम मदतीला उभे असणारे नेतृत्त्व
राजकारणात अनेक नेते भेटतात, पण ‘कायम मदतीला उभ असणारं’ नेतृत्त्व विरळ असते. बाळासाहेब सागर यांनी हे सिद्ध केले आहे. नैसर्गिक आपत्ती असो, शैक्षणिक अडचण असो, किंवा शासकीय कामातील गुंतागुंत – ते नेहमीच आपल्या नागरिकांच्या पाठीशी भिंतीसारखे उभे राहिले आहेत. साकूर गटाच्या विकासासाठी, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि गटाला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी बाळासाहेब सागर यांच्यासारख्या कर्तबगार, निष्ठावान आणि लोकहितैषी नेतृत्वाची आज साकूर गटाला नितांत गरज असल्याची जनसामान्यांची भावना आहे.
