संगमनेर (DSNews24/किरण पुरी) गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणूकांच्या तारखा अद्यापही जाहीर झाल्या नाहीत. मात्र काही दिवसांपूर्वी गट व गणाच्या सदस्यपदाचे आरक्षण निघाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावून प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यातच संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषदेच्या गटाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
साकूर गटात जिल्हा परिषदेसाठी सध्या कॉंग्रेसकडून सुप्रसिद्ध व्यापारी बाळासाहेब भाऊसाहेब सागर यांचं नाव चर्चेत आहे. तसेच त्यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच महायुतीकडून भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे पांडुरंग भोसले यांचं नाव जिल्हा परिषदेसाठी गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आलं आहे. त्यामुळे या दोन युवा संभाव्य उमेदवारांमध्ये लढत होण्याची दाट शक्यता आहे. मात्र वेळेलाच चित्र स्पष्ट होणार आहे. त्यातच जांबुतचे उपसरपंच सुभाष डोंगरे हे देखील जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असल्याची चर्चा समोर आलीय. तसेच सुभाष डोंगरे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी अशी मागणी देखील होताना दिसत आहे. तसेच त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेयला सुरूवात केली आहे. सुभाष डोंगरे हे कॉंग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली असून जर पक्षाकडून तिकिट मिळाल नाही तर थेट अपक्ष उमेदवारी करणार आहे. त्यामुळे साकूर गटात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुभाष डोंगरे यांची राजकीय पार्श्वभूमी काय?
सुभाष डोंगरे हे संगमनेर तालुक्यातील जांबुत येथील रहिवासी आहे. तसेच ते सध्या जांबुत ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आहे. डोंगरे यांची राजकीय पार्श्वभूमी बघितली तर त्यांनी १९८६ साली राजकारणात उडी घेतली. त्याकाळात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने शिवसेनेत सक्रिय झाले. मुंबई राहून त्यांनी काम चालू केले. १८८८ ते १९९३ या काळात सुभाष डोंगरे यांनी मुंबईतील लालबाग शाखा क्रमांक ४१ चे शाखाप्रमुख म्हणून काम केले. त्यामुळे तेव्हा कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाऊ लागले. एक आक्रमक चेहरा म्हणून सुभाष डोंगरे यांची चर्चा सुरू झाली. २०१२ पर्यंत सुभाष डोंगरे यांनी एकनिष्ठ पणाने शिवसेनेचे काम केले. त्यानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेसमध्ये सक्रिय झाले. आजपर्यंत ते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली साकूर पठार भागात एकनिष्ठ पणाने काम करत आहे.
पहिल्यांदाच निवडणूक लढवली अन् यशही मिळविले
सुभाष डोंगरे यांनी सन डिसेंबर २०२२ मध्ये जांबुत ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी वार्ड क्रमांक १ मधून निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड देखील झाली. त्यांनी या माध्यमातून गावातील अनेक विकासकामे मार्गी लावले आहे.
सुभाष डोंगरे यांची पठार भागात ओळख काय?
साकूर पठार भागात सुभाष डोंगरे यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. गावच्या विकासाबरोबरच त्यांनी पठार भागातील महत्त्वाच्या विषयावर आंदोलन, उपोषण केले आहे. पठार भागासाठी पिंपळगाव खांड धरणाच्या पाणी सोडण्यात यावे यासाठी जांबुत येथे सलग आठ दिवस बेमुदत आमरण उपोषण केले. तसेच वीज प्रश्न, रस्ता प्रश्नांसाठी त्यांनी आंदोलन केले. जनतेच्या हितासाठी त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यामुळे साकूर पठार भागात सुभाष डोंगरे यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली.
बाळासाहेब थोरात यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते
उपसरपंच सुभाष डोंगरे हे कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांनी गावच्या विकासासाठी कोट्यावधींचा निधी मंजूर करत विकासकामे मार्गी लावले.
संघर्षयोद्धा सुभाष डोंगरे
जनसामान्यांसाठी कायमच सुभाष डोंगरे धावून जात आहे. संघर्ष करून एखाद्या सामाजिक प्रश्नांवर वाचा फोडण्याचे काम त्यांनी केलंय. जीवाची पर्वा न करता त्यांनी आजपर्यंत संघर्ष केला आहे. पाणी, वीज, रस्ता अशा विविध प्रश्नांसाठी त्यांनी स्वतःचा विचार न करता आंदोलन, उपोषणाच्या माध्यमातून संघर्ष केला. या सर्व विषयांची दखलही प्रशासनाला घ्यावी लागली. म्हणूनच सुभाष डोंगरे यांची संघर्षयोद्धा अशीही ओळख आहे. तसेच नुकतेच काही दिवसांपूर्वी नागपूर येथे माजी मंत्री बच्चू कडू यांनी पुकारलेल्या कर्जमाफी आंदोलनात सुभाष डोंगरे सहभागी झाले होते. तेथेही आपली भूमिका मांडली होती.
सुभाष डोंगरे यांनी निवडणूक लढवावी?
गेल्या २० ते २५ वर्षांपासून राजकारणात सुभाष डोंगरे सक्रिय आहे. तसेच जांबुत गावचे उपसरपंच देखील आहे. त्यांना सर्व विषयांचा अभ्यास आहे. नागरिकांच्या समस्यांची जाणीव त्यांना आहे. एक लढावू व्यक्तीमत्व म्हणून ते पठारभागात परिचित आहे. तसेच त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. तसेच चर्चेलाही उधाण आलं आहे. जरी पक्षाकडून तिकिट मिळाल नाही तरी त्यांनी अपक्ष उमेदवारी करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहे.
