नाशिक – काही दिवसांपूर्वीच सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली होती. त्यानंतर आता ही घटना ताजी असतानाच सिन्नरच्या नायब तहसीलदाराला अडीच लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संजय भिकाजी धनगर (वय ५१) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. जमिनीचा अनुकूल निकाल लावून देण्याच्या बदल्यात धनगर यांनी तक्रारदाराकडे १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. अखेर, तडजोडीअंती अडीच लाखांमध्ये हे प्रकरण निकाली काढायचे ठरले. त्यानुसार, शहरातील सोपान रूग्णालयासमोर लाच स्वीकारत लाचलुचपत पथकाने सापळा रचून धनगर यांना अटक केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
