साकूरमध्ये आला बिबट्या, रऊफ शेख यांची तातडीने आ. अमोल खताळांकडे “ही” मागणी

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) सध्या बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच संगमनेर तालुक्यातील साकूरसह परिसरातील गावांमध्ये बिबट्यांची दहशत बघायला मिळत आहे. नुकतेच साकूरमधील शिक्षक काॅलनी व पटेल वस्ती परिसरात बिबट्याचे काही नागरिकांना दर्शन झाल्याने एकच घबराट पसरली आहे. या परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

नुकतीच जवळे कडलग येथे एका चिमुकल्याला बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली असून पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी तातडीने उपाययोजना म्हणून या घटनेची भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी गंभीर दखल घेत आमदार अमोल खताळ यांच्याकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केलीय.

आ. अमोल खताळ यांनी देखील तातडीने दखल घेत वनविभागाला आजच या परिसरात पिंजरा लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Comment