अहिल्यानगर महापालिकेचा एक्झिट पोल समोर, कुणाला किती जागा मिळू शकते….

राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान संपलं असल्याने ‘एक्झिट पोल’ समोर येऊ लागले आहे. अहिल्यानगर महापालिकेचा देखील ‘एक्झिट पोल’ समोर आला आहे. सकाळ माध्यम समूहाच्या साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार, एकनाथ शिंदे शिवसेनेला धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. अहिल्यानगर महापालिकेत जवळपास भाजप-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस युतीची सत्ता जवळपास निश्चित दिसते आहे.

मतदारांनी दिलेला हा कौल मतपेटीत बंद झाला असून त्याची उद्या शुक्रवारी (16 जानेवारी) सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. सकाळ माध्यम समूहाच्या साम टीव्हीवर महाराष्ट्रातील सर्वात अचून ‘एक्झिट पोल’ प्रसिद्ध झाला आहे. साम टीव्हीचा हा ‘एक्झिट पोल’नुसार अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत भाजप-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची युती सत्तेवर येताना दिसत आहे.

अहिल्यानगर महापालिका एक्झिट पोलनुसार, भाजपला 19, एकनाथ शिंदे शिवसेनेला 14, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला 24, काँग्रेस दोन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला चार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला चार आणि बहुजन समाजवादी पक्षाला एक जागा मिळताना दिसत आहे. एक्झिट पोलनुसार अहिल्यानगर महापालिकेत भाजप-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे एकत्रित संख्याबळानुसार 33 होऊन, सत्ता स्थापन करताना दिसत आहे.

Leave a Comment