आरटीओच्या ‘दंडेलशाही’ विरोधात संगमनेरचे रिक्षाचालक आक्रमक ; ठाकरेंच्या शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

संगमनेर – वाढती स्पर्धा आणि इंधन दरवाढीमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या रिक्षाचालकांना आता प्रादेशिक परिवहन विभागाच्या (RTO) जाचक दंडवसुलीचा सामना करावा लागत आहे. श्रीरामपूर आरटीओ कार्यालयातील अधिकारी किरकोळ कारणांसाठी ४ ते ८ हजार रुपयांपर्यंत दंड आकारून गरिबांच्या तोंडचा घास हिरावत असल्याचा आरोप करत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित ‘वाहतूक सेना’ संगमनेरच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

वाहतूक सेनेचे तालुकाप्रमुख अशोक सूर्यभान बढे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या रिक्षा व्यवसायात प्रचंड स्पर्धा असून उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अशातच श्रीरामपूर आरटीओचे अधिकारी ‘मार्च एंडिंग’चे टार्गेट पूर्ण करण्यासाठी रिक्षाचालकांवर अन्यायकारक दंडाची सक्ती करत आहेत. जाचक दंड, गाडीचे पासिंग नसणे, एखादा प्रवासी जास्त असणे किंवा पीयूसी/एनओसी नसणे अशा किरकोळ चुकांसाठी थेट ४ ते ८ हजार रुपये दंड आकारला जात आहे. दंडाची रक्कम एका महिन्याच्या कमाईपेक्षा जास्त असून, पैसे न भरल्यास रिक्षा जप्त केल्या जात आहेत. हा प्रकार ‘हुकूमशाही’ असल्याचा संताप रिक्षाचालकांनी व्यक्त केला आहे.

जर ही सक्तीची आणि अन्यायकारक वसुली तात्काळ थांबली नाही, तर संगमनेर शहरातील सर्व रिक्षा चालक, मालक आणि वाहक संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे ‘ठिय्या आंदोलन’ करतील. या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी आणि खासदार देखील सहभागी होणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

सदर निवेदनात देतेवेळी उपजिल्हाप्रमुख अमर भाऊ कतारी (उ बा ठा शिवसेना), वाहतूक सेना जिल्हाप्रमुख, (उ बा ठा ) इम्तियाज भाई शेख, संगमनेर शहर प्रमुख फैसल शेख (उ बा ठा), संगमनेर तालुकाप्रमुख हासे भाऊसाहेब, अमोल डुकरे, शानू शेख, रफिक शेख, शिवसेना शहरप्रमुख अमित चव्हाण, आश्वी ग्रामीण तालुकाप्रमुख प्रकाश गायकवाड, उपतालुकाप्रमुख संजय सोनवणे, उप तालुका प्रमुख दत्तू नाईक, रवींद्र गिरी, महमूद सय्यद, परवेज शेख, रहीम बेग, दीपक वनम, व्यापारी आघाडीचे शहर प्रमुख संभव लोढा, सह रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

“नियम हे जनतेच्या हितासाठी असावेत, छळासाठी नव्हे. मार्च एंडिंगच्या नावाखाली गरिबांना लुटणे थांबवावे, अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल.”

— अशोक बढे, तालुकाप्रमुख, वाहतूक सेना.

4000 रुपये दंड आकारला जात आहे परंतु श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात बोलावून त्याच्याकडून एजन्ट मार्फत अनाधिकृतपणे कोणतीही पावती न देता लाच स्वरूपात 8ते 10हजार जास्त उकळले जातं आहे व रिक्षा सोडली आहे असाही प्रकार आरटीओकडून होत असल्याने रिक्षा चालकाकडून संबंधित आरटीओ अधिकारी बद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे आमदार अमोल खताळ व आमदार सत्यजित तांबे यांना याबाबत लेखी तक्रार दिली आहे दोन्ही आमदारांनी सदर घटनेची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले—-

एम्तियाझ शेख जिल्हा प्रमुख वाहतूक सेना…..

Leave a Comment