अबब…पायाला रक्ताचे डाग दिसल्याने पोलिसांनी त्याला थांबवले अन्

सख्ख्या भावाने पेव्हर ब्लॉकने ठेचून बहिणीचा खून केल्याची घटना शिर्डीतील कालिकानगरमधील मयूरेश्वर कॉलनीत मंगळवारी सायंकाळी घडली.

याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केली आहे.

ज्ञानेश्वरी नवनाथ कुलथे (कय 17) असे मृत अल्पवयीन मुलीचे नाव असून, श्रुत नवनाथ कुलथे (वय 19) याला अटक करण्यात आली आहे. मुलीचे आजोबा प्रवीण काशीनाथ विसपुते (कय 65) यांनी फिर्याद दिली आहे.

अज्ञाताने आपल्या नातीचा खून केल्याची फिर्याद प्रवीण विसपुते यांनी शिर्डी पोलिसांत दिली होती. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळी धाक घेत तपास सुरू केला. यानंतर पोलिसांना मुलीच्या भावाबद्दल माहिती मिळाली. आरोपीचा शोध घेत असताना येवला ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना पेट्रोलिंगदरम्यान एक संशयित दुचाकीस्वार दिसला.

त्याच्या पायाला रक्ताचे डाग दिसल्याने पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता, त्याने आपले नाव सांगितले. रक्ताच्या डागाबद्दल विचारले असता, आपण राहत्या घरीच लहान बहिणीशी वाद झाल्याने तिच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ तपास करीत आहेत.

Leave a Comment