IMD : अहमदनगरसह ‘या’ जिल्ह्यांत बरसणार मुसळधार पाऊस

IMD : येत्या दोन दिवसात पश्चिम बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळ धडकणार आहे. यामुळे हवामानात पुढील काही दिवस बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असल्याने अनेक राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नाशिक, अहमदनगर, पुणे, मराठवाड्यामध्ये परभणी लातूर आणि हिंगोली या भागांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या भागात हवामान विभागाने ऑरेंट अलर्ट जारी केला आहे. शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Leave a Comment