Sharad Pawar : शरद पवारांच्या राजीनाम्यावर मोठा गौप्यस्फोट

शरद पवार यांनी आपल्या लोक माझे सांगती भाग दोन या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांना धक्का बसला होता.

मात्र नेत्यांनी केलेल्या मनधरणीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे…

शरद पवारांच्या राजीनाम्यावर बोलतांना पाटील म्हणाले की, शरद पवारांचा राजीनामा कायम राहण्यासाठी बरेच जण देव पाण्यात घालून बसले होते. राष्ट्रवादीपासून शरद पवार बाजूला गेले असते तर अनेक प्रश्न निर्माण झाले असते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर त्यांचा इशारा नेमका कोणाकडे आहे? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment