सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदे सरकार राहिल का? शरद पवार म्हणाले

बारामती : राज्यातील सत्तासंघर्षाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही नाव त्यात आहे. सर्वांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नेमके काय होईल?, शिंदे-फडणवीस सरकार तरेल की गडगडेल?, असे प्रश्न सर्वांच्याच मनात आहेत. या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काय होऊ शकेल याबाबत त्यांनी स्पष्ट केले आहे.

बारामतीत आलेल्या शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाच्या प्रकरणाबाबत बोलताना सांगितले की, सध्या भाजप व शिंदे यांचे विधानसभेत बहुमत आहे. सर्वोच्च न्यायालयात काहीही निकाल लागला तरी त्याचा परिणाम सरकारवर होणार नाही, असे मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.

Leave a Comment