पोलीस भरतीवेळी अंडरवेअरमध्ये सापडली “ही” गोष्ट, अहिल्यानगर, जुन्नरच्या चार उमेदवारांवर गुन्हा दाखल

मुंबई – नवी मुंबई पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेदरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शारीरिक चाचणीदरम्यान उत्तेजकता वाढवण्यासाठी इंजेक्शन वापरल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ४ उमेदवारांवर कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कळंबोली इथं सध्या नवी मुंबई पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. रविवारी उमेदवारांची शारीरिक चाचणी सुरू असताना काही उमेदवारांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं पोलिसांनी त्यांची झडती घेतली. तपासणीदरम्यान त्यांच्या अंडरवेअरमध्ये लपवून ठेवलेली इंजेक्शनं पोलिसांना आढळून आली.

ही इंजेक्शनं घेऊन शारीरिक क्षमता आणि उत्तेजकता वाढवून चाचणी देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं समोर आलं. भरती प्रक्रियेत यश मिळवण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवला. आकाश पानसरे (वय २९), सुयोग होले (वय २१) , सुनील कडुसकर (वय २६) आणि संकेत डोंगरे (वय ३०) अशी आरोपी उमेदवारांची नावं आहेत. यापैकी पानसरे हा जुन्नरचा रहिवासी असून उर्वरित तिघेही अहिल्यानगर येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Comment