तळीरामांसाठी मोठी बातमी! आता पेट्रोल पंपांवरही मिळणार दारू….

देशात युद्धजन्य परिस्थिती आणि संभाव्य इंधन तुटवड्याच्या चर्चांमुळे अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र असताना, चंदीगडमध्ये मात्र वेगळ्याच कारणामुळे पेट्रोल पंप चर्चेत आले आहेत.

चंदीगड प्रशासनाने नव्या अबकारी (Excise) धोरणाला मंजुरी दिली असून आता पेट्रोल पंपांवरही दारू विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. नवीन धोरणानुसार दारू विक्री केवळ पारंपरिक दुकानांपुरती मर्यादित राहणार नसून शॉपिंग मॉल, स्थानिक बाजारपेठा आणि निवडक व्यावसायिक ठिकाणीही विक्री करता येणार आहे.

नव्या धोरणानुसार ‘या’ ठिकाणी दारू विक्रीस परवानगी :

– पेट्रोल पंप

– शॉपिंग मॉल

– स्थानिक बाजारपेठा

– मोठी डिपार्टमेंटल स्टोअर्स

नवे नियम काय असतील?

प्रशासनाने दारू विक्री अधिक पारदर्शक आणि नियंत्रित ठेवण्यासाठी काही कठोर नियम लागू केले आहेत. प्रत्येक दारू दुकानात डिजिटल पेमेंट बंधनकारक असून बार, हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये अल्कोहोल मीटर बसवणे आवश्यक आहे.

दारू वाहतूक करणाऱ्या वाहनांना GPS ट्रॅकिंग अनिवार्य असेल. सर्व विक्री केंद्रांवर CCTV आणि लाईव्ह मॉनिटरिंग असणार आहे. बोटलिंग प्लांट आठवड्यात 6 दिवस सुरू ठेवण्याची परवानगी. प्रशासनाच्या मते, हे नियम जबाबदार मद्यपानाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी लागू करण्यात आले आहेत.

दारू दुकानांची संख्या आणि दरवाढ :

चंदीगडमध्ये एकूण 97 दारू दुकानांना मान्यता दिली आहे. भारतीय मद्य, बिअर आणि वाईनच्या किमतीत कमाल 2% दरवाढ होण्याची शक्यता आहे.

प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, नव्या अबकारी धोरणाचा उद्देश फक्त दारू सहज उपलब्ध करून देणे नाही, तर संपूर्ण विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि अवैध दारू विक्रीवर नियंत्रण ठेवणे हा आहे.

नियंत्रित विक्री, डिजिटल व्यवहार आणि तंत्रज्ञानाच्या वापरामुळे महसूल वाढीसोबतच नियमांचे पालन अधिक प्रभावी होईल, असा प्रशासनाचा दावा आहे.

Leave a Comment