Rupali Chakankar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून रुपाली चाकणकर यांनी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
राजीनाम्याच्या पत्रात चाकणकर यांनी नमूद केले की, “मी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. तो स्वीकारावा,” अशी विनंती त्यांनी केली आहे.
या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून, सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्या राजीनाम्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी पक्षांतर्गत घडामोडींना यामुळे वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
