बिग ब्रेकिंग! पुण्यात पावसाचा प्रकोप, रस्त्यावर पाणीच पाणी, वाहने जागेवरच थांबली

पुणे : पुण्यात भर उन्हाळ्यात मुसळधार पाऊस पडताना बघायला मिळत आहे. वातावरणात झालेल्या बदलांमुळे पुण्यात पावसाचा प्रकोप बघायला मिळतोय. पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसासह गारपीट झाली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडताना दिसतोय. दोन दिवसांप्रमाणे आजही पुणे शहरात पावसाने धुमाकूळ घातलेला बघायला मिळत आहे. पुण्यात दुपारनंतर आजसुद्धा वातावरणात बदल झाला. पुणे शहरात विविध भागांत काळोख संचारलेला बघायला मिळाला. यानंतर ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. या मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वारांना अनेक अचडणींना सामोरं जावं लागलं. तसेच चारचाकी वाहनचालकांनाही गाडीचे लाईट लावून मार्ग काढावा लागत आहे.

पुणे शहरातील अनेक भागांमध्ये काळोख बघायला मिळतोय. ढग दाटून आल्यामुळे हा काळोख निर्माण झाला आहे. तसेच मुसळधार पाऊस देखील पडत आहे. त्यामुळे रस्त्यावर फुटपाथच्या उंचीपर्यंत पाणी साचलं आहे. या परिस्थितीत रस्ता दिसावा यासाठी अनेक वाहनचालकांकडून लाईट लावून मार्ग काढण्यात येत आहे. रस्त्यावर एक ते दीड फूटापर्यंत पाणी भरलं आहे. पुणे शहरातील स्वारगेट, वारजे, शिवाजी नगर परिसर या ठिकाणी पाणी साचलं आहे. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर पाणी साचलं आहे. तसेच शिवाजीनगर परिसरातही रस्त्यावर पाणी साचले आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी गारपीट झाली आहे. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

Leave a Comment