BREKING! संतोष वाडेकर यांच्यासह भूमिपुत्रच्या पदाधिकाऱ्यांचा BRS पक्षात प्रवेश 

अहमदनगर : शेतकरी प्रश्नांवर आक्रमक व निर्भीड भूमिका घेणारे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर, राज्य कार्यकारिणी पदाधिकारी किरण वाबळेपाटील, अशिफभाई शेख, अशोक आंधळे, अविनाश देशमुख, राजु रोकडे यांनी आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या उपस्थित हैदराबाद येथे पक्ष प्रवेश केला.

तेलंगाना राज्यात सरकारने शेतकऱ्यांसाठी गोदावरी व कृष्णा नदी जोड प्रकल्प (कालेश्वरम पाणी योजना) राबवली आहे वीस लाख एकर शेतीसाठी मोफत पाणी दिले आहे तसेच पूर्ण वेळ सिंचन दिले जात आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज पूर्ण दाबाने २४ तास दिली जाते कसलाही चार्ज नाही, पेरणी व खरीप हंगामात एकरी दहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर दिले जातात त्यामुळे शेतकरी आनंदात आहे प्रशासना मधली जी काही चुकीचे पद्धतीने वागणाऱ्या प्रथा सर्व बंद केलेले आहेत.

शेतकरी वर्गाच्या सर्व पिकांना आधारभूत किमती प्रमाणे आठ हजार खरेदी केंद्र तयार करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे राज्य सरकार शेतकऱ्यांचा विमा भरते व शेतकरी कुटुंबात कोणी दगावल्यास पाच लाख रुपये तात्काळ वारसाच्या खात्यावर आठ दिवसाच्या आत दिले जातात रयतू बंधू योजनेतून यंत्रसामग्री व अवजारे 90 टक्के सबसिडी व अनुदान दिले जात आहे. निराधार व भूमिहीन लोकांस घरकुल योजना राबवली जात आहे, राज्यात तलाठी पद व कार्यालय बंद केले आहे. डिजिटल धरणी पोर्टल माध्यम निर्माण करून क्रांती केली आहे.

सिंचन योजनेतून चार हजार तलाव भरले जात आहे त्यामुळे विहीर पुनर्भरण झाले आहे अवकाळी पाऊस आणि नुकसान झाल्यास एक महिन्यात भरपाई दिली जात आहे सद्यस्थितीमध्ये जो काही अवकाळी पाऊस झाला व त्यामुळे जे धानाचे नुकसान झाले आहे सरकारने जो पूर्वी भाव दिलेला होता त्याच भावात भिजलेले धानसुद्धा विकत घेतले आहे निराधार व अपंग यास प्रति महिना तीन हजार रुपये मासिक दिले जातात मंदिर व्यवस्थेमध्ये पुजाऱ्यांना पगार व मंदिरात जो काही दानपेटीतनं निधी तयार होतो हा सर्व सरकारी दप्तरी जमा होतो जगातील सर्वात मोठ्या नामांकित अशा कंपन्या तेलंगण राज्यात आलेले आहेत.

व्यवसायास पंधरा दिवसात परवाने दिले जातात अशा प्रकारच्या लोकप्रिय व लोक हिताच्या योजना राबवणारे आधुनिक काळात बळीराजाचे राज्य निर्माण करत आहेत त्यांचे हे कार्य भारतात अत्यंत प्रभावशाली असून या कार्याला भारतात तोड नाही त्यामुळे या पक्षाची महाराष्ट्र राज्यात गरज आहे यामुळे मुख्यमंत्री के सी आर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला आहे.

या पक्ष प्रवेश वेळी मा. माणिकराव कदम किसान सेल प्रदेश अध्यक्ष, मा बि जे देशमुख भारत राष्ट्र समिती, बच्छाव नाना समन्वयक, मा. आमदार जीवन रेड्डी ( महाराष्ट्र प्रभारी) यांच्या सह मोठया संख्येने भारत राष्ट्र समितीचे मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment