हवामान विभागाकडून येत्या 17 आणि 18 एप्रिलला मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. असं असलं तरी 18 तारखेला दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. यामध्ये सोलापूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे.
विशेष म्हणजे हवामान विभागाकडून 19 एप्रिलला वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आल आहे. यामध्ये सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्निगारी, पुणे, अहिल्यानगर, परभणी, नंदुरबार, धुळे, नाशिकचा घाट परिसर या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. 19 तारखेनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
