राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यात तापमान 40 अंशाच्या पुढे गेलं आहे. त्यामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, काल बुधवारी अहिल्यानगर जिल्ह्यात 41.9 अंश तर तर नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील सुंदगी या गावात 47 अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळं सुंदगी हे देशातील सर्वाधिक उष्ण गाव ठरलं आहे.
जिल्ह्यात तापमानाचे दररोज नवनवे उच्चांक पाहायला मिळतायेत. परवा 40, काल 41.9 चा टप्पा गाठलाय. दुपारच्या वेळी रस्त्यांवर उन्हामुळे संचारबंदी सदृश्य परिस्थिती पहायला मिळती आहे. पुढील काही दिवसात तापमानाचा पारा अजून वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे तसेच घराबाहेर पडताना टोपी रुमाल गॉगल यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील तापमान
अकोला – 44.2, अमरावती – 44, भंडारा – 41, बुलढाणा – 42.4, चंद्रपूर – 42.6, गडचिरोली – 42.6, गोंदिया – 42, नागपूर – 43.4 , वर्धा – 43.9, यवतमाळ – 42.8, वाशिम – 42.6, नवी मुंबई -37, सांगली – 41.8, बारामती – 40.2, परभणी – 42, रत्नागिरी – 32.8, मुंबई (सांताक्रुज) – 34.5, सातारा – 40.9, नंदूरबार- 38.4, नाशिक – 38.8, कोल्हापूर – 39.6, मालेगाव – 43.2, माथेरान – 34.6, धाराशिव – 41, उदगीर – 40.5, सोलापूर -43.3, जालना – 40.6, बीड – 41.3, ,संभाजीनगर- 40.8, अहिल्यानगर – 41.9. जळगाव – 42.3.
