प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह सोहळा 3 मे रोजी संगमनेरमध्ये पार पडत आहे. या सोहळ्याच्या भव्यतेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात असतानाच आता लग्नातील ‘शाही मेन्यू’ समोर आला असून त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
या विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. याशिवाय विविध संत-महंतांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांची उपस्थिती लक्षात घेता, जेवणाची व्यवस्था अत्यंत नियोजनबद्ध आणि पारंपारिक पद्धतीने करण्यात आली आहे. या शाही विवाह सोहळ्यासाठी अस्सल महाराष्ट्रीयन शाकाहारी पदार्थांची मेजवानी असणार आहे.
मुख्य आचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा सोहळा भव्य असला तरी जेवणाचा बेत मात्र पूर्णपणे पारंपारिक आणि सात्विक ठेवण्यात आला आहे. हजारो लोकांसाठी शुद्ध शाकाहारी भोजन तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. इन्स्टाग्रामवर यश नागरे याच्या सोशल मीडियावरील व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
केवळ जेवणासाठी आणि पाहुण्यांच्या आसनव्यवस्थेसाठी 100 एकर परिसरात भव्य मंडप उभारला आहे. विशेष म्हणजे, विवाह सोहळ्याच्या दिवशीच त्याच ठिकाणी गगनगिरी महाराज सप्ताहाचा ध्वजारोहण सोहळाही पार पडणार आहे. त्यामुळे धार्मिक वातावरणात हा विवाह सोहळा पार पडणार असल्याचे चित्र आहे. लाखो लोक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, हा विवाह सोहळा राज्यातील सर्वात चर्चित कार्यक्रमांपैकी एक ठरणार आहे.
मेन्यूमध्ये खालील पदार्थांचा समावेश?
मोती पाक बर्फी, मिक्स व्हेज, चौपाटी, डाळ भात, पुरी, मटकी
