संगमनेर(DSNews24/किरण पुरी) ग्रामीण भागातील मुल अडचणींवर मात करून शिक्षण घेत असतात. मुलींना शिक्षणाची संधी मिळाली तर त्या संधीच सोनं करून दाखवतात. हाच आदर्श मांडवे बुद्रुक गावातील रंगनाथ धुळगंड यांच्या लेकीन समाजासमोर ठेवला आहे. आई वडीलांच्या कष्टाचं फळ आणि पतीच्या भक्कम साथीन सुनिता धुळगंड हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक बनली आहे. एमपीएससी परीक्षेत सुनिताने मिळविलेले यश पुढील पीढीसीठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे प्रतिपादन एकविरा फाऊंडेशनचा अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी केले आहे.
संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सुनिता रंगनाथ धुळगंड ( पांढरे) हिने घवघवीत यश संपादन करत राज्यात ३८ वा तसेच मुलींमधून दुसरा क्रमांक मिळवत पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार समारंभप्रसंगी डॉ. जयश्री थोरात बोलत होत्या.
यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर होते तर व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, उद्योजक बाबासाहेब कुटे, थोरात कारखान्याचे संचालक रामदास धुळगंड सर, युवा नेते बाळासाहेब सागर, आदिकराव खेमनर, कोंडाजी कुदनर, रेवजी धुळगंड, मिरा शेटे, जयराम ढेरंगे, लहानु खेमनर, योगेश खेमनर, रूपेश धुळगंड, सुर्यभान खेमनर आदि मान्यवर उपस्थित होते.
सत्कारापुर्वी मांडवे बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने सुनिता रंगनाथ धुळगंड ( पांढरे) हीची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर जाहिर सत्कार करण्यात आला. सुनीता ही मांडवे बुद्रुक सोसायटीचे माजी चेअरमन रंगनाथ धुळगंड यांची कन्या असून तीने मिळविलेल्या यशाबद्दल मांडवेकरांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
जयश्री थोरात बोलताना पुढे म्हणाल्या की, रंगनाथ धुळगंड यांनी उत्कृष्ट परिवार घडवला आहे. त्यांच्या कन्या सुनिता आणि प्रियांका पुढील पीढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. चांगलं शिक्षण मिळाल तर आपण काय करू शकतो हे सुनीतान करून दाखवलं आहे. हाच आदर्श ठेवून मुलींनी खचून जाऊ नका. आई वडीलांनी मुलींमागे भक्कम उभे राहून त्यांच्या शिक्षणावर जोर दिला पाहिजे. आज सुनीता सर्वांना भारी पडली आहे. आता सुनितान पुढील पीढीसाठी मार्गदर्शन केले पाहिजे. दहावी व बारावीच्या निकालात देखील मुलींचं यशस्वी ठरल्या आहेत. आपण कशातच कमी नाही हे वारंवार मुलींनी सिद्ध करून दाखवले आहे. मात्र युवक वर्ग सध्या इतर गोष्टींकडेच भरकटत चालला आहे. त्यामुळे युवक वर्ग मागे पडत आहे. युवकांनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे तसेच गावाला पुढ नेल पाहिजे. एकाग्रता लावून अभ्यास करा. तसेच आई वडीलांच नाव मोठं करा असे डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या.
सर्वत्र ठिकाणी सत्कार झाला. पण मात्रृभूमीत मिळालेला मानसन्मान खुप काही उमेद देऊन गेला. गावान खुप काही दिलं. आई वडीलांनी माझ्यासाठी खुप काही केलं.
पोलिस उपनिरीक्षक – सुनिता रंगनाथ धुळगंड ( पांढरे)
यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
