आता “या” लोकांना पेट्रोल डिझेल मिळणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने खळबळ

युद्धामुळे जागतिक पातळीवर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. भारतालाही याची झळ बसताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये इंधनाची कमतरता निर्माण झाली आहे. लोक इंधनासाठी लांबच लांब रांगा लावत आहेत.

जालन्यातही काही प्रमाणात इंधन टंचाई निर्माण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी दिली आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलची काळ्या बाजारात विक्री केल्याचे आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर काही लोकांना पेट्रोल न देण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

या लोकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही

जालना जिल्ह्यात होणाऱ्या इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व पेट्रोल पंप चालकांना पाच टक्के इंधन साठा राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्याबरोबत कॅन-बॉटल आणि इतर बॅरलमध्ये पेट्रोल आणि डिझेल देऊ नका अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता अशा लोकांना इंधन मिळणार नाही. जालना जिल्ह्यात काही ठिकाणी इंधनाची कमतरता भासत असल्याचीही माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

काळा बाजार रोखण्यासाठी निर्णय

काळ्या बाजारात पेट्रोल आणि डिझेलची होणारी विक्री थांबवण्याच्या उद्देशाने बॉटल आणि कॅन मध्ये इंधन देण्यास मनाई करण्यात आली असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच काळ्या बाजारात इंधनाची विक्री आढळून आल्यास त्यावर कठोर कारवाई करण्याचाही इशाराही मित्तल यांनी दिला आहे. तसेच इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर काळजी घेऊन पेट्रोल-डिझेलचा वापर करावा आणि शक्यतो प्रवास टाळावा असं आवाहन देखील अशी जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आलं आहे.

Leave a Comment