मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करत ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच या योजनेचा लाभ घेणारे शेतकरी पुढील पीककर्ज चक्रासाठीही पात्र राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मुंबई येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “३० जूनपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली जाईल. कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुढील पीककर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.”
निवडणुका कर्जमाफीच्या निर्णयात अडथळा नाही –
राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुका कर्जमाफीच्या निर्णयात अडथळा ठरणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “कर्जमाफीचा निर्णय निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. विधान परिषद निवडणुकीतील मतदार हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे त्याचा शेतकऱ्यांवर परिणाम होणार नाही. आवश्यकता भासल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घेतली जाईल,” असे फडणवीस यांनी सांगितले
