मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस पडत असल्याने अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरण भरले आहे. अकोले तालुक्यातील भरलेले हे दुसरे धरण आहे. त्यामुळे आता मुळा धरणात पाणी येण्याला सुरवात झाली आहे.
पिंपळगाव खांड भरल्यानंतर प्रवाहीत झालेल्या मुळा नदीचे पाणी शनिवारी (ता. ४) रात्रीपर्यत मुळात धरणात पोहचेल. मुळात पाण्याची आवक सुरु झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे
