मुंबई | ७ ऑगस्ट : राज्यातील हवामानात बदल होत असून पुढील काही दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस, तर घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण
पालघर, ठाणे आणि मुंबई येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र
धुळे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. नंदुरबारमध्ये हलका पाऊस पडू शकतो. जळगावमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक आणि नाशिक घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम पाऊस व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पुणे आणि सातारा घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहरात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये हलका पाऊस पडू शकतो. सोलापूरमध्ये हलका ते मध्यम पावसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
मराठवाडा
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर येथे हलका ते मध्यम पाऊस व विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे. धाराशिव आणि बीड जिल्ह्यांतही हलक्या पावसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
विदर्भ
यवतमाळ, गोंदिया, अकोला, वाशिम, वर्धा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, भंडारा आणि अमरावती जिल्ह्यांसाठी आज कोणताही विशेष हवामान इशारा जारी करण्यात आलेला नाही.
