मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
वृषभ : जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. जुनी येणी वसूल होतील.
कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.
सिंह : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कन्या : प्रियजनांचा सहवास लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृश्चिक : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
धनु : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत.
मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
मीन : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही
