लोकसभेत ३५० जागा जिंकून पुन्हा भाजप सत्तेत येणार….

महाविकास आघाडी सरकार वज्रमुठ असल्याचे भासवत सर्वांची लुट करत असून या वज्रमुठीला आरपीआय तसेच भाजप पक्ष घाबरत नसून येणार्‍या 2024 लोकसभा निवडणुकीत लोकसभेत 350 जागा जिंकून भाजप सरकार पुन्हा सत्तेत येईल यासाठी आपण सर्वांनी आम्हाला साथ द्यावी असे आवाहन आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी येथे आयोजित केलेल्या आरपीआयच्या राष्ट्रीय अधिवेशनात केली.

शिर्डी येथे आरपीआय पक्षाच्या वतीने दोन दिवस राष्ट्रीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे अविनाश मातेकर, बाबुराव कदम, गौतम सोनवणे, पप्पू बनसोडे, चंद्रकला सोनकांबळे, माजी मंत्री संदीप कुमार विजयराव वाकचौरे, बाळासाहेब गायकवाड, नागालँडचे आमदार उपस्थिती होते. सीमाताई आठवले, जित आठवले, दीपकराव गायकवाड, अजय साळवे, सुरेंद्र थोरात, भीमा बागुल, पप्पू बनसोडे, धनंजय निकाळे यांच्या देशातील 20 राज्यातून आरपीआय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना .आठवले म्हणाले, महाविकास आघाडी सरकार वज्रमुठ बांधण्याच भासवत आहे. परंतु त्यांनी सर्वांची लूट करण्याचे काम केले आहे. असे असले तरी भाजप सरकार त्यांच्या वज्रमुठीला घाबरत नसून येणार्‍या 2024 निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत 350 जागा जिंकून भाजप सरकार पुन्हा सत्तेत येईल.

यात कुठली प्रकारची शंका नाही. आरपीआय पक्षाचे काम 32 राज्यात असून महाराष्ट्रात या पक्षाची मोठी ताकद आहे. आर.पी.आय पक्ष ज्या पक्षासोबत राहतो त्या पक्षाची सत्ता देशात येते.

Leave a Comment