अजित पवार (Ajit Pawar) कार्यक्षम नेते असून त्यांनी आमच्यासोबत यावं,” अशी खुली ऑफर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर ( Deepak Kesarkar) दिली आहे.
आज सकाळी केसरकर यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
दीपक केसरकर पुढे म्हणाले की “अजित पवार यांच्याबद्दल मला अतिशय आदर आहे. दादा विरोधी पक्षाचे नेते, जबाबदार नेते आहेत. त्यांनी अशी वक्तव्ये करु नये.
संजय राऊत यांच्यासारखे लोक रोज बोलतात त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. मात्र दादा जेव्हा बोलतात ते जनता त्याला गांभीर्याने घेते. सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये दादा आमच्याबरोबर आघाडीवर असतील याची मला खात्री आहे.”
“दादांनी पण सरकारमध्ये यावे ही आमची अपेक्षा आहे. दादा हे कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्या कामाचा फायदा हा राज्यातील जनतेला झाला पाहिजे. राष्ट्रवादीमध्ये त्यांच्यासोबत काय होतंय हे सर्वांना माहित आहे,” अशा शब्दात दीपक केसरकर यांनी अजित पवार यांना सरकारमध्ये येण्यासाठी ऑफर दिली
