आमदार निलेश लंके म्हणाले, बाळासाहेब थोरातांनी महसूलमंत्री पद सांभाळले पण….

परिवर्तनाची सुरुवात राहात्यातून झाली आहे याचा शेवट नगर दक्षिणमध्ये होणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले.

बाळासाहेब थोरातांनी अनेक वर्षे महसूलमंत्री पद सांभाळले पण कधी सत्तेचा गैरवापर केला नसल्याचे लंके म्हणाले. सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना जागा दाखवली, तुम्हाला सलाम, संयमी नेतृत्व असलेल्या बाळासाहेब थोरातांना फुल एनर्जी असणाऱ्या विवेक कोल्हेंची साथ मिळाली.

तुम्ही उडवलेल्या गुलालाने त्यांची झोप उडवली आणि सत्तेची धुंदी उतरवल्याचे लंके म्हणाले. जनतेने ठरवले तर काहीही होऊ शकते. मी कमी बोलतो पण काम दाखवतो. गणेश कारखाना वाचवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे लोक एकत्र आले होते असेही निलेश लंके म्हणाले.

Leave a Comment