बीआरएसचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात सर्व निवडणुका लढवणार असल्याची मोठी घोषणा केली.
यानंतर चंद्रशेखर राव यांनी BRS पक्षाचा महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार देखील निवडला आहे. महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याला चंद्रशेखर राव यांनी थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे.
बीआरएसच्या महाराष्ट्र प्रवेशामुळे राज्यातल्या नेत्यांना भीती का असा सावल सरकोलीतील सभेतून केसीआर यांनी उपस्थित केला होता. बीआरएस शेतक-यांची बी टीम असल्याचेही ते म्हणाले होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना BRSनं मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. मात्र, के. चंद्रशेखर राव यांची ही ऑफर आपण धुडकावून लावली, असा दावा राजू शेट्टी यांनीच केला आहे.
BRS पक्षात प्रवेश करण्याची अट त्यांनी घातली होती. शेतकरी नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न के. चंद्रशेखर राव करत आहेत, असा आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे.
