बिग ब्रेकिंग! उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाच….

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने समन्स बजावलं आहे. मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना 14 जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या समन्सनंतर ठाकरे आणि राऊत कोर्टात हजर राहतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

ठाकरे आणि राऊत यांना समन्स का?

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात बदनामीकारक मजकूर छापून आणल्याच्या आरोपाप्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं आहे. राहुल शेवाळे यांच्याविरोधात ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये काही मजकूर छापून आला होता.

या मजकुरावर राहुल शेवाळे यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी या मजकुराविरोधात मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेत मानहानीचा दावा केला होता. त्यांच्या या तक्रारीची दखल मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाने घेतली आहे.

याप्रकरणी आज कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून ठाकरे आणि राऊत यांना समन्स बजावण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी 14 जुलैला कोर्टात हजर राहावे, असा आदेश देण्यात आला आहे.

Leave a Comment