लखनऊ : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे त्यांच्यावर गोळीबार झालाय. चंद्रशेखर आझाद गाडीने जात होते.
यावेळी त्यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात चंद्रशेखर आझाद थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे.
पण आझाद यांना कंबरेला गोळी चाटून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे ते जखमी झाले आहेत. आझाद यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. संबंधित घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
